एचडीएफसीने घेतलेल्या मुलाखतीत विद्यापीठातील 50 विद्यार्थ्यांची निवड

vidyapith

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षातंर्गत खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळख असलेल्या हाऊसिंग डेव्हल्पमेंट अॅण्ड फायनान्स (एचडीएफसी) बँकेतर्फे घेण्यात आलेल्या परिसर मुलाखतीद्वारे ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

एसडीएफसी बँकेतर्फे विद्यार्थ्यांसाठी परिसर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय प्रशिक्षण आणि नियुक्ती कक्षाचे समन्वयक डॉ. भूषण चौधरी आणि स्कुल ऑफ मॅनजमेन्ट चे समन्वयक डॉ.आर.जे.सरदार यांनी मुलाखतीचे व्यवस्थापन केले. या परिसर मुलाखतीत विद्यापीठ प्रशाळा व संलग्नित महाविद्यालयातील १६४ विद्यार्थी उपस्थिती होते. या परिसर मुलाखती व समुहचर्चेद्वारे ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यावेळी एचडीएफसीचे क्लस्टर हेड अकबर बेपारी, एरंडोल शाखेचे ब्रँच मॅनेजर चेतन पाटील, बँकएज मुंबई येथील संचालक जितेंद्र वैद्य, सतिष देवकर हे उपस्थित होते.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील, प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहूलीकर, कुलसचिव भ.भा.पाटील, स्कुल ऑफ मॅनेजमेन्ट स्टडिजचे संचालक प्रा.अनिल डोंगरे, केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाचे समन्वयक डॉ. भूषण चौधरी यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

Protected Content