यावल येथील उर्दू हायस्कूलचा निकाल १०० टक्के; सैय्यद महवश प्रथम

यावल प्रतिनिधी । शहरातील इंदीरा गांधी उर्दू गर्ल्स हायस्कुलचा दहावीच्या शालांत परिक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून कुमारी सैय्यद महवश आशिक हुसैन हिने ९१.४० टक्के गुण मिळवुन शाळेत प्रथम क्रमांने उर्तीर्ण होण्याचा बहुमान मिळवला आहे.शाळेतील ९१ विद्यार्थ्यांपैकी ७३ टक्के गुण मिळवून इतर सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

शाळेतून प्रथम सैय्यद महवश आशिक हुसैन ९१.४० टक्के, द्वितीय नहेरीन फातेमा गुलामगौस ८९.८० टक्के, महेजबीन असलम खान ८९.६०टक्के गुण मिळवुन शाळेतुन तृत्तीय क्रमांकाने उर्तीर्ण झाली आहे. शाळेतील ९१ विद्यार्थीनी या ७३ टक्केपर्यंत गुण मिळवुन तर इतर सर्व विधार्थीनी या प्रथम श्रेणीत उतीर्ण झालेल्या आहेत. दहावीच्या शालांत परिक्षेत इंदीरा गांधी उर्दु गर्ल्स हायस्कुलच्या विद्यार्थिनींच्या यशामुळे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सैय्यद मुमताज, शेख ईमाम यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षक, हायस्कुलचे चेअरमन हाजी मुस्तफा खाँ सुब्हान खाँ, संस्थेचे अध्यक्ष हाजी शेख ताहेर शेख चाँद विद्यार्थीनींचे अभिनंदन करून त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत .

Protected Content