गरुड विद्यालय व महाविद्यालयात ‘प्रजासत्ताक दिन’ उत्साहात

शेंदुर्णी प्रतिनिधी । आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने शाळेच्या भव्य प्रांगणात देशाचा ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कोरोना काळातील नियमांचे पालन करून या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यालयातील ध्वजाचे ध्वजारोहण संस्थेचे चेअरमन संजयराव गरुड यांनी केले तर भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे ज्येष्ठ संचालक सागरमल जैन यांनी केले.

या कार्यक्रमाप्रसंगी शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेचे चेअरमन संजयराव गरुड, जिल्हा परिषद सदस्या सरोजनी ताई गरुड, संस्थेचे सचिव सतीशचंद्र काशीद, संचालिका उज्वलाताई काशीद, संस्थेचे ज्येष्ठ संचालक सागरमल जैन ,शेंदुर्णी नगरीचे उपनगराध्यक्ष निलेश थोरात, संस्थेचे सहसचिव दिपकराव गरुड ,माजी पंचायत समिती सदस्य शांताराम गुजर ,माजी पंचायत समिती सदस्य सुधाकर अण्णा बारी ,नगरसेवक धीरज जैन ,वस्तीगृह सचिव कैलास देशमुख, निकम गुरुजी, उत्तम थोरात ,विद्यालयाचे मुख्याध्यापक एस .पी .उदार ,उपमुख्याध्यापक ए.बी. ठोके, शेंदुर्णी नगरीतील ग्रामस्थ, पालक ,विद्यालयातील सर्व शिक्षक ,शिक्षिका ,प्राध्यापक, प्राध्यापिका, कर्मचारी व एन.सी.सीचे विद्यार्थी उपस्थित होते ध्वजारोहण झाल्यानंतर संविधान उद्देशिका वाचन करून कार्यक्रमाची सांगता झाली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे उपशिक्षक डी .एस. वारांगणे यांनी केले.  येथील  अ. र. भा. गरुड महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन मान्यवर, शिक्षक व विद्यार्थी  यांच्या उपस्थितीत पार पडला .यावेळी ध्वजस्तंभ पूजन कोरोना योद्धा,राजश्री ताई पाटील  (प्रा. आ. केंद्र.परिचारिका शेंदुर्णी) व त्यांचे पती श्री तुळशीराम पाटील आदर्श शेतकरी यांच्या हस्ते तर  ध्वजारोहण धी शेंदुर्णी सेकं.एज्यू. सोसायटी चे जेष्ठ  संचालक श्री सागरमलजी जैन यांच्या हस्ते करण्यात आले . या प्रसंगी चेअरमन संजय गरुड, सरोजिनी ताई गरुड (जि.प. सदस्या जळगाव), प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील , शेख फारुख व सुनील गरुड तसेच शिक्षक, शिक्षकेतर बंधू-भगिनी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन  क्रीडा संचालक डॉ. महेश पाटील यांनी केले.

Protected Content