पिळोदा फाट्याजवळ पकडले अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील मनवेल थोरगव्हाण रस्त्यावरील पिळोदा फाट्याजवळून अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर सोमवारी ३१ जानेवारी रोजी दुपारी यावल पोलीसांनी पकडले. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकावर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील मनवेल थोरगव्हाण रस्त्यावरील पिळोदा फाट्यावर सोमवार ३१ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी राहूल चौधरी हे गस्तीवर असतांना अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर (एमएच १० एपी ९३७४) पोलीसांनी पकडले. वाळू वाहतूकीचा परवानाची विचारणा केली असता ट्रॅक्टर चालक निलीख विनोद कोळी (वय-१९) रा. मनवेल ता. यावल याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीस कर्मचारी राहूल चौधरी यांनी वाळूचे ट्रॅक्टर यावल पोलीसांनी जमा केले व चालकाला ताब्यात घेतले. पो.कॉ. राहूल चौधरी यांच्या फिर्यादीवरून सायंकाळी ६ वाजता यावल पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालक निखील कोळी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सिकंदर तडवी करीत आहे.

 

Protected Content