यावल येथे नव भारत मित्र मंडळातर्फे दांडियाचे आयोजन

 

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील नव भारत मिग मंडळ महाजन गल्ली यावलच्या वतीने दस-याच्या पुर्वसंधेला यावल येथे भव्य दांडिया स्पर्धेचे भव्य असे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धचे बक्षिस वितरण समारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाले.

यावल येथील भुसावळ मार्गावरील आई हॉस्पीटल जवळच्या प्रांगणावर अतिशय अप्रतिम असे नियोजन, हिंदूसंस्कृतीचे जतन करीत करण्यात आले होते. मागील तीन दिवसा पासुन सुरू असलेल्या या डांडीया स्पर्धेत, स्पर्धकांचा उत्साह ओसंडून वहात होता. विविध प्रकारच्या आकर्षक व उठावदार पोषाखात तरूणाई उत्साहात आपली नृत्यकला सादर करण्यात रंगून गेली होती. या सोहळ्यातील नृत्याविष्कार पहाण्यासाठी यावलकरांची मोठी गर्दी झाली होती.

डाॅ. कुंदन फेगडे यांच्या सहकार्याने आणि तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, शहराध्यक्ष निलेश गडे यांच्या नेतृत्वाखाली सदर कार्यक्रमाचे अप्रतिम आयोजन करण्यात आले होते यासाठी भूषण फेगडे, स्नेहल फिरके, अनिकेत सरोटे आणि रितेश बारी यांनी विशेष सहकार्य केले.

युवापिढीच्या कलागुणांना वाव देता यावा त्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी संधी उपलब्ध व्हावी यासाठी त्यांना प्रोत्साहन म्हणून विविध पारितोषीके जाहीर करण्यात आली होती. लहान गट, मध्यम गट, मोठा गट, उत्कृष्ट जोडी, किंग ऑफ द इव्हेंट, क्वीन ऑफ द इव्हेंट आणि दोन समूह नृत्याविष्कार अशी पारितोषिके देण्यात आली.

प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रू. ११००१/- (वीर मुंडा ग्रुप हिंगोणा) धनराज विसपुते यांच्या सौजन्याने, द्वितीय पारितोषिक रू.७१११/- (रणरागिणी ग्रुप यावल) केतकी पाटील यांच्या सौजन्याने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक रू.५१०१/- (उत्कृष्ट जोडी) सविता भालेराव यांच्या सौजन्याने तसेच इतर पारितोषिके निलेश बारी, नितीन बारी, विवेक पाटील, राकेश कोलते, प्रगतीशील शेतकरी प्रमोद नेमाडे, डाॅ. प्रशांत जावळे, संदीप महाजन, देवयानी महाजन, पौर्णिमाताई फालक, निलेश पाटील, जयवंत माळी या विविध मान्यवरांच्या सौजन्याने घोषित करण्यात आली होती.

उपस्थित सर्व स्पर्धकांना तसेच भाविकांना नवरात्री आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देत, संस्कृतीचे जतन आणि संवर्धन या दोन्हीचे उत्तम उदाहरण यावल येथे पहायला मिळाले असे सांगत, सर्वांनीच हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढे वाटचाल केल्यास आपल्या देशाला जागतिक पातळीवर सर्वात उच्च स्थान प्राप्त करून देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण होईल यात शंका नाही असे म्हणत धनराज विसपुते यांनी आयोजकांचे कौतुक करत, युवा पिढीला शुभेच्छा दिल्या.

त्या प्रसंगी केतकी पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सविता भालेराव, युवा समाजसेवक डाॅ. कुंदन फेगडे, डाॅ. जागृती ताई फेगडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, रोहिणी फेगडे, भाजपाचे शहराध्यक्ष निलेश गडे, हेमराज फेगडे यांच्यासह इतर अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content