यावल तहसील कार्यालयात दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

यावल प्रतिनिधी । येथील तहसील कार्यालयात दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या माहितीनंतर महसुल कार्यालयात एकच खळबळ उडाली असुन आज सकाळीच कार्यालयात तात्काळ र्निजतुकीकरण फवारणी करण्यात आली आहे.

दरम्यान मिळालेल्या माहीतीनुस, जळगाव येथे वास्तव्यास राहणारे व यावलच्या तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे त्यांच्या स्वॅब तपासणी अहवालातुन निष्पन्न झालेय. या दोघ कर्मचाऱ्यांना जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले आहे. संबंधित दोघ कर्मचाऱ्यांचे अहवाल हे पॉझीटीव्ह आल्याचे कळताच यावल नगर परिषदच्या आरोग्य व स्वच्छता विभागाकडून तात्काळ तहसीलच्या पुरवठा विभाग कार्यालयासह संपुर्ण कार्यालयाची र्निजतुकीकरण फवारणी करण्यात आली आहे. तसेच यावल शहरात नव्याने मिळालेल्या २१ रुग्ण संख्या पाहता कोरोनाच्या विषाणु संसर्गाचा पुनश्च प्रादुर्भाव यावल शहरात वाढतो की काय अशी भिती नागरीकांमध्ये पसरली असुन, आरोग्य यंत्रणेस सर्तक राहण्याच्या सुचना देवुन नागरीकांनी अनलॉकच्या काळात देखील अधिक जबाबदारीने व नियमांचे काटेकोर पालन करावे, असे प्रांत अधिकारी डॉ. अजित थोरबोले, तहसीलदार जितेन्द्र कुवर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला यांच्या वतीने नागरिकांना अहवान करण्यात आले आहे.

Protected Content