समाधान कोळीने ‘लांब उडी’ स्पर्धेत मिळविले सुवर्णपदक                

 

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्र. सहकारी समाज संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी समाधान रतिलाल कोळी (टी. वाय. बी. ए.)याने राज्यस्तरीय सुवर्ण व रौप्य असे दुहेरी पदक पटकविले आहे.

जळगाव येथील महाराष्ट्र शांती खेळ असोसिएशन मार्फत महाराष्ट्र राज्यस्तरीय ( २०२२-२३) च्या क्रिडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यात महाविद्यालयातील विद्यार्थी समाधान कोळी याने लांब उडी या स्पर्धेत सहभाग घेऊन प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक मिळविले, तसेच १०० मीटर धावणे या स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवून रौप्य पदक मिळविले.

या समाधान कोळी या विद्यार्थ्याने मिळवलेल्या दुहेरी यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे, उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील, प्रा. एम. डी. खैरनार व प्रा. संजय पाटील यांनी सत्कार करून गौरव केला.

तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. समाधान कोळी याचे समाज बांधवाच्या वतीने सर्वत्र कौतुक होत आहे.

Protected Content