नाथाभाऊंच्या जावयांचे संगीत उद्योगात पदार्पण; पहिला अल्बम लवकरच होणार प्रदर्शीत !

मुक्ताईनगर, पंकज कपले | माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांनी संगीत उद्योगात पदार्पण केले असून त्यांच्या समर प्रॉडक्शन या कंपनीच्या माध्यमातून ‘ना होना तुमसे दूर’ हा अल्बम लवकरच प्रदर्शीत होत आहे. आज याचा टिझर रिलीज करण्यात आला असून तो चर्चेचा विषय बनला आहे.

एकनाथराव खडसे यांची कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर यांच्या समर प्रॉडक्शनच्या माध्यमातून ‘ना होना तुमसे दूर’ हा अल्बम निर्मित करण्यात आला आहे. याबाबतची माहिती आज जाहीर करण्यात आली आहे. याचे पोस्टर आणि टिझर रिलीज झाल्यानंतर याची निर्मीती प्रांजल खेवलकर यांनी केल्याचे जगासमोर आले आहे.

या अल्बममध्ये ख्यातनाम पॉप स्टार गजेंद्र वर्मा आणि अभिनेत्री मनारा चोप्रा यांची प्रमुख भूमिका आहे. यातील गाणी ही गजेंद्र वर्मा यांनीच म्हटलेली असून संगीत देखील त्यांचेच आहे. गजेंद्र वर्मा यांच्या युट्युब चॅनलवरून हा अल्बम ६ ऑगस्ट रोजी प्रदर्शीत होणार आहे. यानंतर यातील गाणी क्रमाक्रमाने रिलीज करण्यात येणार आहे. livetrends news

दरम्यान, या अल्बमबाबत डॉ. प्रांजल खेवलकर यांच्याशी प्रस्तुत प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी ‘ना होना तुमसे दूर’ या अल्बमच्या निर्मितीला दुजोरा दिला. ते म्हणाले की, या अल्बममधील पहिल्या गाण्यात गजेंद्र वर्मा आणि प्रियंका चोप्राची बहिण मनारा चोप्रा यांची प्रमुख भूमिका आहे. या गाण्याच्या रिलीजचा कार्यक्रम ६ ऑगस्ट रोजी अंधेरीत होणार आहे. दरम्यान, या अल्बममधील सुमारे १२ ते १५ गाणी ही बॉलिवुडमधील विविध सेलिब्रीटीजच्या माध्यमातून रिलीज होणार आहे. यात त्यांच्या भूमिका असतील. यातील शुटींग हे लवकरच दुबई येथे करण्यात येणार आहे. तर पहिल्या गाण्याचे शुटींग हे काश्मीरमध्ये करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, या अल्बमबाबत आता खूप उत्सुकता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

डॉ. प्रांजल खेवलकर
आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!