कोथळी ग्रामपंचायतीवर खडसे परिवाराचे वर्चस्व

मुक्ताईनगर पंकज कपले l संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे मुळगाव असणाऱ्या कोथळी येथील ग्रामपंचायतीवर आज लागलेल्या निकालातून खडसे कुटुंबाचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी ग्रामपंचायतीच्या 11 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. कोथळी हे गाव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे गाव आहे. त्यात 5 जागांवर शिवसेना पुरस्कृत उमेदवार निवडून आले आहेत, तर उर्वरित 6 जागांवर राष्ट्रवादी व भाजप समर्थक असलेले उमेदवार निवडून आलेले आहेत. शिवसेना पुरकृत 5 उमेदवारांच्या विरोधात निवडून आलेले 6 उमेदवार हे आपले समर्थक असल्याचा दावा एकनाथ खडसेंच्या कन्या ऍड. रोहिणी खडसे व भाजप खासदार रक्षा खडसे यांनी केला आहे. या ठिकाणी दोन्ही गटाला समसमान जागा मिळाल्याने सरपंच नेमका कोणत्या गटाचा असेल, याबाबत उत्सुकता आहे.

Protected Content