अब्दुल गफ्फार मालिक फाउंडेशनतर्फे पूरग्रस्तांना मदत

जळगाव, प्रतिनिधी ।  ‘राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट’च्या माध्यमातून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवहनानंतर अब्दुल गफ्फार मालिक फाउंडेशनतर्फे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्याकडे  ३१ हजार रुपयांचा  धनादेश  सुपूर्द करण्यात आला.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार  यांनी ‘राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट’च्या माध्यमातून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांचे संसार उभे करण्यासाठी घरगुती वस्तूंचे १६ हजार किट्स वाटण्याची घोषणा केली.  त्यानंतर राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून पूरग्रस्तांची मदत करण्यासाठी  आज पक्षाचे  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यक विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष स्व. डॉ.अब्दुल गफ्फार मालिक यांचे चिरंजीव  एजाज अब्दुल गफ्फार मलिक यांनी अब्दुल गफ्फार मालिक फाउंडेशनतर्फे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्याकडे  रुपये ३१ हजारांचा  धनादेश  सुपूर्द केला. यावेळी  जळगाव जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक, आमदार अनिल भाईदास पाटील,  प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे,  माजी  मंत्री गुलाबराव देवकर,  जिल्हाध्यक्ष रविन्द्र पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, माजी आमदार दिलीप वाघ, माजी  आमदार मनीष जैन, माजी आमदार दिलीप तात्या सोनावणे, माजी आमदार जगदीश वळवी, रोहिणीताई खडसे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदना  चौधरी, महिला महानगर अध्यक्षा मंगला पाटील, संजय पवार, संजय गरुड़, उन्मेष पाटील,  प्रदेश युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, नामदेवराव चौधरी, महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील, योगेश देसले, अशोक लाड़वंजारी,  विनोद देशमुख, स्वप्निल नेमाड़े,  रविंद्रनाना पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Protected Content