७५ करोड सूर्यनमस्कार अभियानात मू.जे. महाविद्यालयाच्या ‘सोहम् योग विभागा’चा सहभाग

जळगाव प्रतिनिधी | ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’निमित्त देशातील विविध संस्थांच्या माध्यमातून ७५ करोड सुर्यनमस्कार घालण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी नोंदणी करण्यात येत असून यात जळगावातील ‘मू. जे. महाविद्यालय’अंतर्गत ‘सोहम् योग विभागा’ने सहभाग नोंदविला आहे.

देशातील नामांकित संस्थांच्या माध्यमातून ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’निमित्त ७५ करोड सुर्यनमस्कार घालण्याचा संकल्प करण्यात आला असून देशातील विविध संस्थांच्या माध्यमातून हा संकल्प पूर्ण करण्यासाठी नोंदणी करण्यात येत आहे. त्यामध्ये ‘मू. जे. महाविद्यालय’ अंतर्गत ‘सोहम डिपार्टमेंट ऑफ योगा अॅण्ड नॅचरोपॅथी’ने आपला सहभाग नोंदविला आहे. महाविद्यालयाच्या वतीने या अभियानात ५५० पेक्षा अधिक साधकांनी २१ दिवस रोज १३ सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प करून नोंदणी केली आहे.

हा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आणि नोंदणी केलेल्या साधकांना शास्त्रशुद्ध सूर्यनमस्कार शिकविण्यासाठी नि:शुल्क सूर्यनमस्कार कार्यशाळेचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले आहे. कार्यशाळेच्या आयोजनासाठी प्राचार्य डॉ. सं. ना. भारंबे यांचे सहकार्य लाभले.

ही कार्यशाळा रोज सायंकाळी ४ वाजता प्रा. गीतांजली भंगाळे यांच्या माध्यमातून ऑनलाईन घेतली जाणार आहे. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी ९८२३३६१६८९ या क्रमांकावर संपर्क साधत अभियानात आपला सक्रीय सहभाग नोंदवावा असे आवाहन सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अॅण्ड नॅचरोपॅथी चे संचालक डॉ. देवानंद सोनार यांनी केले आहे.

Protected Content