रासायनिक खतांच्या किमती कमी करा – राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी

यावल, प्रतिनिधी | केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या वाढत्या किमती कमी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने तहसीलदार महेश पवार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

 

निवेदनाचा आशय असा की, केंद्र सरकारच्या आखत्यारीत येत असलेल्या खत व कृषी मंत्रालयाच्या नियंत्रणातून संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना विविध सरकारी व खाजगी कंपन्याद्वारा रासायनिक खते उपलब्ध होत असतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून रासायनिक खतांची प्रचंड प्रमाणात भाव वाढ होत असुन, ही दरवाढ शेतकऱ्यांना जीवघेणी ठरत आहे. युरिया व डीएपी वगळता पोटेश व मिश्र खतांमध्ये ४०% ते ६०% भाववाढ फक्त मागील दोन महिन्यात झाली आहे. पोटॅशचे दर ऑक्टोबर महिन्यात ८७५ रुपये होते, नोव्हेबर महिन्यात २०१५ ते २०४० रुपये डिसेंबर महिन्यात १३५० रुपये तर जानेवारीत तब्बल १७०० रुपये पर्यंत ७० %एवढी बेहिशेबी दरवाढ झाली. त्याच प्रमाणे मिश्र खतात १५१५१५, १०२६२६, २४२४०० आदी खतांच्या किमतीत ४०% इतकी मोठी दरवाढ झाली आहे. आधीच केळीचे बाजार भाव ३०० ते ४०० रुपये खरेदी होत असतांना रासायनिक खतांच्या किमतीत प्रचंड प्रमाणात भाव वाढ करुन केंद्र सरकार शेतकऱ्यांची अक्षरशः थट्टा करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी केंद्र सरकारने या भाववाढीवर नियंत्रण आणून, शेतकऱ्यांवर होत असलेला अन्याय थांबवावा, अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घेत शेतकरी रस्त्यावर उतरतील. तसेच आम्ही सर्व शेतकरी प्रधानमंत्री कार्यालयास हजारो पोस्टकार्ड पाठवून लक्ष केंद्रीत करत न्याय मागत आहोत. निवेदनावर तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले, विजय पाटील, दिनकर पाटील, वसंत पाटील, राष्ट्रवादीचे फैजपुर शहराध्यक्ष अन्वर खाटीक, राष्ट्रवादी आदीवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष एम बी तडवी , अतुल पाटील, अॅड. देवकांत पाटील, विकास पाटील, पवन पाटील, यावल शहराध्यक्ष करीम मन्यार , महीला आघाडीच्या पदाधिकारी यांच्यासह अन्य राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येत उपस्थित होते.

Protected Content