नितीन गवळी यांनी जिल्हास्तरीय कुस्ती निवड चाचणीत पटकाविला प्रथम क्रमांक

 

पाचोरा, प्रतिनिधी । येथे जळगाव जिल्हा कुस्तीगीर परिषदतर्फे नुकत्याच आयोजित जिल्हास्तरीय कुस्ती निवड चाचणी स्पर्धेत जळगावचे मल्ल पै. नितीन मल्लेशा गवळी यांनी ७० किलो वजन गटामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांची राज्य स्पर्धेसाठी निवड झाल्याने जळगावचे आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते पै. नितीन गवळीचा सत्कार करण्यात आला.  

पाचोरा येथे झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती निवड चाचणी स्पर्धात जळगाव शहर येथील मल्ल पै नितीन मल्लेशा गवळी यांनी  ७० किलो वजन गटामध्ये  उत्कृष्ट कामगिरी करून प्रथम क्रमांकने विजय प्राप्त केला  तसेच त्यांची आगामी राज्यस्तरीय स्पर्धासाठी निवड झाल्याबदल जळगाव शहराचे आमदार माजी कुस्तीपटू राजुमामा सुरेश भोळे यांनी त्यांचा विशेष सत्कार व कौतुक केले. याप्रसंगी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद प्रांतीक सदस्य व जिल्हा सचिव पै. सुनिल देशमुख, जळगांव तालुका कुस्तीगीर अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे,  जळगांव तालुका सचिव दिलीपराव घुले, दत्तू भामरे पैहेलवान, सुनील शिंदे पैहेलवान, माजी नगरसेवक पै. विजय वाडकर, जिल्हा शिस्तपालन समिती सदस्य राहुल रमेश वाघ, संतोष गवळी व सर्व कुस्तीप्रेमी यांनी अभिनंदन केले

Protected Content