Home धर्म-समाज श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेश मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी सौरभ चौधरी 

श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेश मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी सौरभ चौधरी 

0
23


पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पारोळा शहरातील आझाद चौक परिसरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेश मित्र मंडळाची नवीन कार्यकारिणी नुकत्याच झालेल्या सभासदांच्या बैठकीत सर्वानुमते जाहीर करण्यात आली. यावेळी उत्सवाचे नियोजन, धार्मिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम, युवकांचा सहभाग तसेच परिसरातील नागरिकांना गणेशोत्सवाशी जोडून घेण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यंदाचा गणेशोत्सव भव्य, शिस्तबद्ध, पर्यावरणपूरक आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

बैठकीत सौरभ चौधरी यांची मंडळाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. महेश चौधरी (भोला) यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, प्रसाद चौधरी यांची सचिवपदी निवड करण्यात आली. तसेच बापू मराठे आणि मनोज चौधरी (बंटी) यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली. नवीन कार्यकारिणीची घोषणा होताच उपस्थित सभासद, पदाधिकारी, युवक आणि गणेशभक्तांनी नवनिर्वाचित अध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. मंडळाच्या कामकाजाला अनुभवी कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी सल्लागार समितीचीही निवड करण्यात आली. या समितीत सोनू मराठे, छोटू वाणी, योगेश सुदाम चौधरी, गणेश बारी, विकास चौधरी, विपुल चौधरी, विकी गोसावी, सचिन शालिक चौधरी, गोलू, रवींद्र चौधरी, गोपाल चौधरी, गणेश चौधरी, जयेश, नितीन चौधरी, नाना ठाकूर, दर्शन बागुल, महेश चौधरी, स्वामी चौधरी, सोनू चौधरी, दीपक चौधरी, सचिन चौधरी, उज्वल चौधरी, योगेश राजेंद्र चौधरी आणि भावडू चौधरी यांचा समावेश करण्यात आला.

यंदाच्या गणेशोत्सवात केवळ धार्मिक कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता समाजोपयोगी उपक्रमांना विशेष प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. मंडळाच्या वतीने कीर्तनाचे आयोजन करण्यासोबतच संपूर्ण पारोळा शहरासाठी महाभंडारा आयोजित करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. याशिवाय विविध सामाजिक, जनजागृतीपर आणि समाजप्रबोधनात्मक उपक्रम राबविण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. विशेषतः युवकांमध्ये वाढत असलेल्या व्यसनाधीनतेच्या पार्श्वभूमीवर व्यसनमुक्तीचा संदेश देणारे उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येणार आहे. युवकांमध्ये व्यसनाच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करणे, समाजात सकारात्मक विचार रुजविणे आणि युवकांना विधायक कार्याकडे वळविण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचा मानस मंडळाने व्यक्त केला. गणेशोत्सव हा केवळ मनोरंजनाचा किंवा धार्मिक उत्सव न राहता समाजप्रबोधन, सामाजिक एकोपा आणि सेवाभावाचा उत्सव ठरावा, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून मंडळाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, युवकांचे संघटन, समाजोपयोगी कार्य आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्याचा निर्धार नवनिर्वाचित कार्यकारिणीने व्यक्त केला. गणेशोत्सवाच्या काळात परिसरातील नागरिक, युवक, महिला आणि गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मंडळाच्या विविध उपक्रमांना सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. बैठकीस श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यायामशाळेचे सभासद, मंडळाचे पदाधिकारी, परिसरातील ज्येष्ठ नागरिक, युवक तसेच गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कुणाल मराठे, पवन चौधरी, पवन पाटील, रोहित चौधरी, रुपेश चौधरी, राहुल चौधरी, ओम ईश्वर चौधरी, खुशाल चौधरी, ओम पिंटू चौधरी, पंकज चौधरी, राज पाटील, तेजस भगवान चौधरी, दर्शन वाणी, जयेश चौधरी, यश चौधरी (उर्फ शेरा), साई चौधरी, शुभम चौधरी, नयन गोसावी, धीरज चौधरी, भिमा चौधरी, संदीप चौधरी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. मंडळाच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांनी एकजुटीने सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापू मराठे यांनी केले.


Protected Content

Play sound