कांचननगरातून महिलेची स्कुटी चोरट्यांनी लांबविली; अज्ञात दोघांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील कांचननगरात राहणाऱ्या महिलेची दुचाकीसह डिक्कीत ठेवलेले ३० हजार रूपयांची रोकड अज्ञात दोन जणांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी उघडकीला आली. रात्री उशीरा शनीपेठ पोलीसात अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहिनी प्रविण शिरसाठ (वय-३४) रा. हातेड ता. चोपडा ह.मु. वाणी मंगल कार्यालय कांचन नगर यांच्याकडे स्कुटी (क्रमांक एमएच १९ डीबी २८७०) आहे. शुक्रवारी २० फेब्रुवारी सायंकाळी त्यांनी दुचाकी वाणी मंगल कार्यालयासमोर पार्किंग करून लावली होती. अज्ञात दोन चोरट्यांनी शनीवारी मध्यरात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास दुचाकी लांबविली. दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेले ३० हजार रूपयांची रोकड देखील चोरून नेली. शनिवारी सकाळी दुचाकी जागेवर नसल्याने त्यांनी परिसरात शोध घेतला परंतू मिळून आली नाही. शनीपेठ पोलीस ठाण्यात महिलेच्या फिर्यादीवरून अज्ञात दोन जणांवर दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ परिश जाधव करीत आहे. 

Protected Content