राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या नाशिक विभागीय आयुक्त जिल्हा दौऱ्यावर

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या नाशिक विभागीय आयुक्त या 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी, 2023 या दरम्यान जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे.

त्या दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे-

मंगळवार, दिनांक 31 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता चाळीसगाव, जि. जळगाव येथे आगमन. सकाळी 11.00 ते 2.00 वाजेपर्यंत विविध शासकीय कार्यालय तपासणी, दुपारी 2.00 ते 3.00 वाजता भोजन, दुपारी 3.00 वाजता चाळीसगावहून जळगावकडे प्रयाण. सायंकाळी 6.00 वाजता शासकीय विश्राम गृह, जळगाव येथे आगमन, राखीव व मुक्काम,

बुधवार, दिनांक 1 फेब्रुवारी, 2023 रोजी सकाळी 11.00 ते 1.00 वाजेपर्यंत जिल्हा परिषद, जळगाव येथे विभाग प्रमुख, जिल्हास्तरीय कार्यालय याची आढावा बैठक. दुपारी 1.00 ते 2.00 वाजेपर्यंत सेतू व ई- सेवा केंद्र तपासणी, दुपारी 2.00 ते 3.00 वाजता भोजन, दुपारी 3.00 ते 5.00 दरम्यान विविध शासकीय कार्यालय तपासणी. सायंकाळी 5.00 ते 6.00 वाजे दरम्यान जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय, जळगाव येथे जिल्ह्यातील शेतकरी प्रतिनिधींसाठी प्रशिक्षण. सायंकाळी 6.00 वाजेपासून शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे राखीव व मुक्काम.

गुरुवार, दिनांक 2 फेब्रुवारी, 2023 रोजी सकाळी 8.00 वाजता चोपड्याकडे प्रयाण. सकाळी 9.30 वाजता चोपडा येथे आगमन. सकाळी 10.30 ते 12.00 वाजेपर्यंत तहसिल कार्यालय, चोपडा येथे विविध स्वयंसेवी संस्था यांची आढावा बैठक. दुपारी 12.00 ते 2.00 वाजेपर्यंत विविध शासकीय कार्यालय व सेतू व ई-सेवा केंद्र तपासणी, दुपारी 2.00 ते 3.00 वाजेदरम्यान भोजन. दुपारी 3.00 वाजता परतीचा प्रवास.

Protected Content