बंद कंपनीच्या आवारात वृद्धाचा जळालेला मृतदेह : घातपातची शक्यता

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या जवळच असलेल्या एका बंद कंपनीच्या आवारात वृद्ध सुरक्षारक्षकाचा जळून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी सात वाजता उघडकीला आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रामेश्वर कॉलनी जवळील रामनगर येथील रहिवासी ईश्वर देवराम अहिरे (वय-६६) हे आपल्या परिवारासह रास्तव्याला असून सुरक्षा रक्षकाचे उदरनिर्वाह करून आपला काम करत होते. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या जवळ समोरील बाजूस असलेल्या विक्रम प्लास्टिक यांच्या बंद कंपनीत गुरुवारी १९ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता सुरक्षारक्षक म्हणून रात्री काम करून परतलेले काशिनाथ मराठे यांनी गेट उघडताच त्यांना काहीतरी जळत असल्याचे दिसून आले. त्यांनी पाहिले असता एक इसम जळत असल्याचे समजले. मराठे यांनी लागलीच एमआयडीसी पोलिसांना कळविले.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे हे पथकासह पोहचले आहेत. एमआयडीसी पोलिसात शुभम लालसिंग ठाकूर वय-३० यांनी खबर दिली आहे. अहिरे यांचा घातपात झाला की त्यांनी आत्महत्या केली अशा आशयाने तपास सुरू आहे. याप्रसंगी फॉरेन्सिक लॅबचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून चौकशीला सुरुवात केली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content

%d bloggers like this: