बीएसएनएल पेन्शनधारकांचे विविध मागण्यांसाठी निदर्शने (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । शहरातील बीएसएनएल कार्यालयासमोर ऑल इंडीया बीएसएनएल पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने विविध मागण्यांसाठी सोशल डिस्टन्सिंग ठेवून जिल्हा सचिव सी.डी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निदर्शने करण्यात आली. 

अखिल भारतीय बीएसएनएल पेन्शन धारक असोसिएशन आणि महाराष्ट्र परिमंडळाच्यावतीने २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता हे आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. १ जानेवारी २०१७ पासूनचे पेन्शन रिव्हीजन करावे, डिसेंबर २०१८ पासून पेन्शनर्स यांना मेडीकल बिल आणि इतर भत्ते अदा करावे, गेल्या १ वर्षांपासून प्रलंबित असलेले स्वेच्छा निवृत्तीधारकांना ठरलेली रक्कम अदा करणे, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे पेन्शनविषयकचे प्रलंबित असलेले धोरण तत्काळ मार्गी लावावे, २०१७-१८ पासून निवृत्त झालेले कर्मचारी व अधिकारी यांना आयकर विभागाच्या आलेल्या नोटीसा रद्द कराव्यात, जुन २०२० पासूनचा महागाई भत्ता त्वरीत देण्यात यावा  मागण्या करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर जिल्हा सचिव सी.डी.पाटील यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

Protected Content