Home क्राईम भुसावळात वृध्देची मंगलपोत धुमस्टाईल लांबविली

भुसावळात वृध्देची मंगलपोत धुमस्टाईल लांबविली

0
41
chain snatching


भुसावळ प्रतिनिधी । शहरातील नारायण नगरातून एका वृध्दे महिलेच्या गळ्यातील ३० हजार रूपये किंमतीची सोन्याची मंगळसुत्र अज्ञात चोरट्यांनी दुचाकीवरून लांबविल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता घडली. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, मालती सोनु कोष्टी (वय-६०) रा. सुरत ह्या कामाच्या निमित्ताने भुसावळ शहरातील नारायण नगरात नातेवाईकांकडे आल्या होत्या. २५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अज्ञात दोघे जण दुचाकीवरून येवून त्यांच्या गळ्यातील ३० हजार रूपये किंमतीची सोन्याची मंगलपोत गळ्यातून ओढून चोरून नेली. त्यांनी आरडाओरड केली परंतू दोघेजण दुचाकीवरून पसार झाले आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Protected Content

Play sound