ग.स. सोसायटी निवडणुकीसाठी मतदान

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जिल्ह्यातील जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सोसायटी अर्थात ग.स. सोसायटीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान घेण्यात आले. यात सरासरी ८५ टक्के मतदान झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

 

जिल्ह्यात तसेच राज्यात सर्वात जास्त ३२०४४ सभासद असलेल्या जिल्हा सहकारी नोकरांची सोसायटीची निवडणूक मतदान प्रक्रिया १५ केंद्रावर ६९ बूथवर पार पडली. या निवडणुकीसाठी बाहेरील मतदार संघात ५६, इतर मागासवर्गीय ६, महिला राखीव १२, वि.जा.भ.ज. वि.मा.प्र. ९ आणि स्थानिक २७ असे मतदार संघातून ११६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. जिल्हयात प्रत्येकी एक याप्रमाणे १५ केंद्रावर २८ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यत बहुतांश ठिकाणी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.निवडणूक मतदान प्रक्रियेसाठी ४८३ अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.

दरम्यान,  रात्री ८.३० पर्यंत ३२०४४ पैकी २५३९० इतके मतदान झालेले आहे. अद्याप पर्यंत जिल्ह्यातील १३ बूथ मतमोजणी स्थळी पोचलेले असून ५६ बूथ प्रवासात आहेत. संपूर्ण ६९ बुथ मतमोजणी स्थळी पोहोचल्यानंतर अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात येणार आहे असे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.

Protected Content