‘त्या’ दाव्याची प्राथमिक, पदवीधर व माध्यमिक शिक्षक महासंघातर्फे होळी (व्हिडिओ)

 

यावल प्रतिनिधी । येथील प्राथमिक, पदवीधर व माध्यमिक शिक्षक महासंघाच्या वतीनेच्या वतीने आज यावल येथील एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाबाहेर राज्यातीत वसतीगृह गृहपाल यांनी दिलेल्या निवेदनामध्ये शिक्षण विभागातील मुख्याध्यापक , कनिष्ठ व वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी , सहाय्यक प्रकल्प अधिकारी ( Iशिक्षण ) उपायुक्त या पदांवर पदोन्नतीबाबत मुद्दा क्रमांक १ते ९मध्ये पुढील पदोन्नतीवरील गृहपालांकडे शिक्षण विभागातील मुल्यमापन न लावता गृहपाल यांनी शिक्षण विभागातील सर्व पदोन्नतीवर केलेला दावा चुकीचा असून त्याच्या निषेर्धात आंदोलन करण्यात आले आणि त्या निवेदनाची होळी करण्यात आली.

दरम्यान आज यावल येथे आज एन. बी. झंपलवाड, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, डी. डी. चौधरी, काशिविअ पवन पाटील यांच्यासह प्रमुख पदधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज राज्य शासनाने कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी ( ग्रेड पे४२०० ) पुर्वी असलेल्या केन्द्र प्रमुख या पदाचे विलोपन करून केन्द्र प्रमुख समकक्ष असलेले कनिष्ठ शिक्षण अधिकारी हे पद आदीवासी विकास विभागात निर्माण करण्यात आले होते. हे पद प्राथमिक विभागातील पर्यवेक्षीय यंत्रणेतील पद आहे. इयत्ता १ते ८वी पर्यंतच्या ६ ते १४ या गटातील विद्यार्थ्यांच्या वयोगट हा अत्यंत संवेदशील व भावनिक वयोगट असल्याने अशा गटाचे मुल्यमापन व मार्गदर्शन करणे ही बाब अत्यंत संवेदनशिल असते. त्यामुळे डी.एड. अथवा बी. एड. या पदविका आणि पदवीच्या अभ्यासक्रमात बालमापनशास्त्र अभ्यास असल्याने सदर पदावर प्राथमिक शिक्षक यांना १०० टक्के पदोन्नतीने शिक्षण विभागाप्रमाणे पदोन्नती सेवा विनयमावली तयार करण्यास विनंती करण्यात आली आहे. गृहपाल या संवर्गातुन सहाय्यक प्रकल्प अधिकारी ( प्रशासन नियोजन ) या संवर्गात पदोन्नती होत असल्याने व सदरची पदे हि प्रशासनिक पदे आहेत. परंतु, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण ) हे पद शिक्षण विभागाशी निगडीत असल्याने सदर पदी प्राथमिक मुख्याध्यापक व माध्यमिक शिक्षक संवर्गातुन १००टक्के पदे भरण्यासंबधी सेवाशर्ती नियम तयार करण्यात यावे असे निवेदनाव्दारे म्हटले असुन या आंदोलनात पदाविधर शिक्षक संघाचे एम. एस. सोनवणे, पी. आर. सैदांणे, एल. ए. पाटील, बी. एच. नांदूरे, एस. एम. उगले, एम . डी. चव्हाण , डी. व्ही. पाटील , एस. सी. गांगुर्डे, एस. व्ही. देसले, ए. व्ही. गायकवाड , ए. सी. बारेला , एम. एम. गवारे , एस. बी. भंगाळे यांच्यासह आदी शिक्षकांनी भाग घेतला.

https://www.facebook.com/508992935887325/videos/118313226828394

 

Protected Content