धरणगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील अधिकारांचा वापर करून नव्यानेच ‘महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था नियामक मंडळ’ गठीत केले आहे. विशेष बाब अशी की, महाराष्ट्र शासनाने नव्यानेच स्थापन केलेल्या उपरोक्त नियामक मंडळात धरणगाव येथील राजेंद्र अंकुश पाटील यांची थेट राज्यपालांकडून सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
राजेंद्र पाटील हे जनकल्याण पतसंस्थेचे (धरणगाव) संचालक असून शहरात सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. श्री.पाटील यांना सहकार क्षेत्राचा प्रचंड अभ्यास आहे. तसेच प्रगतिशील शेतकरी असून धरणगाव येथील विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अंकुश पाटील यांचे चिरंजीव व प्रताप कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक एच.ए. पाटील सर यांचे लहान बंधू आहेत.
या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे सहकार राज्यमंत्री तथा पालकमंत्री परभणी गुलाबरावजी पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र धर्मजागरण प्रमुख बाळासाहेब चौधरी, सिनेट सदस्य प्रा.डी.आर.पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबरावजी वाघ, जनकल्याण पतसंस्थेचे चेअरमन शिरीष बयस व सर्व संचालक मंडळ, चोपडा पंचायत समितीचे उपसभापती एम.व्ही.पाटील, जिल्हा मार्केटिंग फेडरेशन संचालक रामनाथ चिधु पाटील (वाघळूद), भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पी.सी.पाटील, जि. प. सदस्य प्रतापराव पाटील, गोपाल पाटील, दोडे गुजर समाज अध्यक्ष चंद्रशेखर पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष सलीम पटेल, प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी व राजस ग्राफिक्स मित्र परिवार यांनी अभिनंदन केले आहे.