यावल येथील पोलीस वसाहतीचे बांधकाम अंतीम टप्प्यात

Yawal1

यावल प्रतिनिधी । येथील पोलीस वसाहतीच्या इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर सुरु असुन, येत्या काही दिवसातच निवाऱ्याविना इतरत्र राहात असलेल्या पोलीस बांधवांना अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर आपल्या हक्काचा निवारा मिळणार असल्याची माहीती औपचारीकरित्या बोलतांना यावलच्या सार्वजानिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी जे.एस. तडवी यांनी प्रतिनिधीशी सांगीतले.

सर्वसामान्याच्या रक्षणासाठी सदैव कार्यत्त्पर राहणाऱ्या आपल्या पोलीसदादांना त्यांच्या हक्काचा निवारा मिळावा या दृष्टीकोणातुन शासनाने काही वर्षापुर्वी लाखो रुपयांचा निधी खर्च करून पोलीस वसाहतीमध्ये निवाऱ्यांची उभारणी केली होती, मात्र काही वर्षात या निवाऱ्यांचे काम अत्यंत निकृष्ठ प्रतिचे झाल्याने या इमारतीमधील घरांना गळती लागल्याने काही दिवसातच या इमारतीत राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ ही इमारत खाली करून दिली होती. सदरच्या या इमारतीचे काम चांगल्या प्रकारे दुरूस्त करून पोलीस बांधवांच्या निवाऱ्याचा प्रश्न विविध स्तरावर मांडण्यात आल्याने शासनाने याची दखल घेवुन इमारतीच्या दुरुस्ती करिता सुमारे ६५ लाख रुपयांचा निधी मंजुर करून घेत अखेर या कामास पुनश्च चांगल्या प्रकारे करण्यात येवुन अखेरी पोलीसांना आपल्या हक्काचा निवारा या सुसज्ज इमारतीमध्ये मिळणार असुन सदरचे दुरुस्तीचे काम हे प्रगतीपथावर असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जे. एस. तडवी यांनी सांगीतले असुन काही दिवसातच संपुर्ण इमारतीचे बांधकाम काम पुर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

Protected Content