महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वितरण (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांच्या पाल्यांना व गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

जळगाव जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे शुक्रवार ५ ऑगस्ट रोजी दुपारी पत्रकारांच्या पाल्यांना व गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यात एकूण ६०० विद्यार्थी विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वितरण यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले.  यामध्ये स्कूल बॅग, कंपास पेटी, लागणारे सर्व शैक्षणिक साहित्य उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छापर मनोगतही व्यक्त केले.  गेल्या दोन वर्षाच्या कोरोनाच्या महामारीनंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात शालेय साहित्य वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जळगाव शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपली उपस्थिती नोंदविली होती.  याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, आमदार  राजूमामा भोळे, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे, जैन उद्योग समूहाचे वरिष्ठ सहकारी अनिल जोशी, डिगंबर महाले, उद्योजक सागर चौबे, करणी सेनेचे अध्यक्ष प्रवीण पाटील, सामाजिक कार्यकर्ते अरुण सपकाळे, उच्च शिक्षण विभागाचे अधिकारी गणेश वळवी आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष कमलेश देवरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा उपाध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हा कार्याध्यक्ष शरद कुलकर्णी,  संजय चौधरी, भूषण महाजन, विलास ताटे, प्रमोद सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

Protected Content