डॉ. बेंडाळे महाविद्यालयात ध्वज संहिता विषयावर व्याख्यान संपन्न

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । डॉ. आण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात ध्वज संहिता या विषयावर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे क्रीडा संचालक प्रा. डॉ. अविनाश असनारे यांचे व्याख्यान संपन्न झाले.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थी विकास विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व डॉ. आण्णासाहेब जी डी बेंडाळे महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ध्वज संहिता या विषयावर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे क्रीडा संचालक प्रा. डॉ. अविनाश असनारे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.

“भारतीय राष्ट्रध्वजाच्या निर्मिती प्रक्रियेसह. राष्ट्रध्वजाच्या विविध पैलूंवर डॉ. असनारे यांनी प्रकाश टाकला. भारतीय राषट्रध्वजात असणाऱ्या रंगांना भारतीय केशरी, भारतीय हिरवा अशी नावे का देण्यात आली,  स्वातंत्र्या पूर्वीच्या तिरंगा ध्वजात मध्यभागी असलेला चरखा जाऊन अशोक चक्र कसे आले?” याचा विस्तृत इतिहास डॉ. असनारे यांनी सांगितला.

“कलिंगाच्या युद्धात झालेली मोठी हिंसा पाहून नंतरच्या काळात अहिंसा व शांतीचे प्रतिक झालेल्या सम्राट अशोकाच्या सारनाथ येथील स्तंभावरील अशोक चक्र जे अहिंसेचे व त्यातील चोवीस आरे मुळे चोवीस तास प्रगतीसाठी कार्यरत असण्याचा संदेश देते असे वक्तव्य त्यांनी केले. भारतीय ध्वज संहितेचे आचरण, ध्वज वंदन, ध्वजाचा अनादर कशामुळे होतो” व ध्वज अनादरामुळे होणाऱ्या शिक्षा अशा विविध पैलूंवर डॉ. असनारे यांनी भाष्य केले.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या कॅप्टन मोहन कुलकर्णी यांनी. “देशाच्या प्रगतीमध्ये युवकांचा सहभाग कसा आणि किती आवश्यक आहे यावर मनोगत व्यक्त केले सोबतच राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी अनेकांनी बलिदान दिले व देत आहेत याची जाणीव त्यांनी उपस्थितांना करून दिली. आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. डॉ. गौरी राणे यांनी महाविद्यालयाच्या वाटचालीचा उल्लेख करीत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाविद्यालयात क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापठाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. अनिता कोल्हे यांनी तर प्रास्ताविक व आभार डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. व्ही. जे. पाटील, डॉ. पी. एन तायडे, प्रा. सुनिता पाटील यांच्यासह प्राध्यापक वृंद व विद्यार्थिनी उपस्थित होते. प्राचार्यांच्या मार्गदर्शनात व्याख्यानाच्या यशस्वितेसाठी प्रा. सुचित्रा लोंढे, प्रा. छाया चिरमाडे, संजय सुरवाडे आदींनी कार्य केले.

Protected Content