साधू-संताची भाषा वेगवेगळी असली तरी अर्थ एकच असतो : अध्यात्मरत्न बा.ब्रह्मचारी बसंतजी महाराज

8fee4350 7c38 4679 a046 bcdcb38ab35b

चोपडा (प्रतिनिधी) जैन समाज एक आहे. पंथ वेगळे असले तरी सर्व जैन धर्मीय बांधव अहिंसा,मानवसेवा, अध्यात्म, आणि भगवान महावीरांचे अनुयायी आहेत. जैन साधू संताची समाजाला समजविण्याची पध्दत वेगळी असली. तरी त्यांच्या भावार्थ मात्र एकच असतो, असे प्रतिपादन अध्यात्म रत्न बाल ब्रम्हचारी श्री बसंतजी महाराज यांनी श्री तारण तरण दिगंबर जैन चैत्यालयच्या नव निर्माण आयोजित भव्य शिलन्यासाच्या कार्यक्रमात केले.

 

शहरातील पांचाळेश्वर गल्लीत दि 21 मे ला झालेल्या भव्य शिलन्यासच्या कार्यक्रमात मंदिरची प्रेरणा देणारे प्रमुख संत म्हणून ते बोलत होते. यावेळी ब्रम्हचारी श्रध्येय श्री दिव्यानंदजी महाराज ,बाल ब्रम्हचारी अर्चना दिदी, बाल ब्रम्हचारी समयश्री दिदी, पंडीत विजय मोही, पंडित निलेशकुमारजी, पंडित भिकमचंदजी ,पंडीत राजेंद्रकुमारजी ,पंडित मनोजकुमारजी सह कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी तर प्रमुख पाहुणे म्हणून पिपल्स बँकचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी ,व्हाइस चेअरमन प्रविणभाई गुजराथी, पिपल्स बँकचे संचालक नेमीचंद जैन, सुनील जैन , महावीर नागरी सह.पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन प्रा शांतीलाल बोथरा, कॉग्रेस (आय)चे संजीव बाविस्कर, जैन समाजाचे जेष्ठ श्रावक प्रदीप बरडीया, सुशील टाटीया, आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. श्री तारण तरण दिंगबर जैन समाजाचे अध्यक्ष संजय (दगडू) जैन, उपाध्यक्ष सुभाषचंद् जैन यांच्यासह अनेकांनी मान्यवरांचे स्वागत केले.

बसंतजी महाराज पुढे म्हणाले की, गावात मंदिर तर कितीही बनवून घ्या. परंतू माणसाच्या हृदयाचे परिवर्तन होणे आवश्यक आहे. हृदय परिवर्तन होवून हृदयातच मंदिर झाले पाहिजे. आमच्या सारख्या साधु संताना समाजाकडून कोणतीही अपेक्षा नाही. परंतु आपल्यात परिवर्तन करू इच्छितो. श्री तारण तरण दिंगबर जैन समाजाचा शेकडो वर्षांपूर्वीच्या इतिहासात फैजपूर ,शिरपुर, चोपडा या गावांचा उल्लेख आलेला आहे. सातपुडा पर्वतावर अनेक संतानी तपचर्या केली आहे. त्यात उनपदेव, सूनपदेव ह्याचा ही उल्लेख आलेला आहे. त्यामुळे चोपडा शहरात 3000 स्वे.फूट जागेत चैत्यालय उभारले जात आहे. ते आपणा सर्वांच्या सहकाऱ्यांने तिर्थस्थान व्हायला पाहिजे. समाजाचे हात फार लांब असतात. मात्र, नजर चक्षु असते. त्यामुळे समाजाच्या कामात झोकून दयावे लागते आणि पारदर्शकता असणे आवश्यक आहे, असे प्रखळ मत त्यांनी आपल्या वाणीतून प्रकट केले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, तारण तरण दिंगबर जैन समाज सरव्याना घेऊन चालणारा समाज आहे. येथे चैत्यालय उभारले जात आहे, त्याचे गौरव संपूर्ण चोपडा शहराला आहे. जसे ऋतू मध्ये वसंत ऋतु आला तर सर्वांना आनंद होतो. तसेच श्री बसंतजी महाराज चोपडा शहरात आले तर शहर वासीयांना आनंद होतो. भव्य चैत्यालय उभारणीची संकल्पना त्यांनी दिली आणि ती आज मृतस्वरूपात आली आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी चैत्यालयसाठी भूमीदान देणारे येथील प्रतिष्ठित व्यापारी प्रकाशचंद केशरलाल जैन(नवरंग परिवार) यांना मान्यवराचा हस्ते सन्मानपत्र देऊन दानभूषण ही पदवी प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमात दानप्रभावना व धर्मप्रभावना मोठ्या प्रमाणात झाली. कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश येथून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री तारण तरण दिंगबर जैन नवयुवकांनी मेहनत घेतली. यावेळी कार्यक्रमाचे प्रस्तावित महेंद्र जैन तर सूत्रसंचालन अजय जैन यांनी केले.

Add Comment

Protected Content