अहिरवाडी येथे वादळी पावसामुळे केळी पिकाचे नुकसान; पंचनामाचे आदेश

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील अहिरवाडी परिसरात वादळी पावसाने हजेरी लावल्याने केळी बागांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक घरांची पडझड झाली आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामा करण्याचे आदेश तहसीलदार यांनी दिलेत.

रावेर तालुक्यात निसर्ग पुन्हा कोपला आहे. तालुक्यातील अहिरवाडी पट्ट्यात मंगळवारी रात्री उशीरा वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अहिरवाडी परिसरातील अनेक हेक्टरवरील बाळू महाजन,शिवम चौधरी, कडू चौधरी, सदाशिव सावळे, शिवलाल महाजन यांचे केळी बागा भुईसपाट झाले असून वीजेचे खांब, डीपीचे नुकसान झालेत. पट्ट्यातील अनेक घरांची पडझड झाली आहे. दरम्यान तालुक्यातील आहिरवाडी, मोरगाव, रावेरचा पट्ट्यात मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे. पंचायत समितीच्या सदस्या धनश्री संदीप सावळे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामा करण्याचे आदेश मंडळाधिकारी, तलाठी यांना देण्यात आले आहे.

Protected Content