पंतप्रधानजी, या संकटाच्या काळात देश तुमच्या सोबत आहे, पण सत्य काय आहे ते सांगा? : शिवसेना

मुंबई (वृत्तसंस्था) आमचे २० जवान शहीद झाले. आपण काय उत्तर दिले? चीनचे किती सैनिक मारले? चीन आपल्या भूप्रदेशात घुसला आहे का? पंतप्रधानजी, या संकटाच्या काळात देश तुमच्या सोबत आहे, पण सत्य काय आहे ते सांगा? काही तरी बोला. देशाला सत्य माहिती पडू द्या, असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे. मोदीजी, तुम्ही शूर आणि योद्धे आहात. तुमच्या नेतृत्वात देश चीनचा बदला घेईल का? असा सवालही त्यांनी केला आहे.

 

 

लडाखमधील गलवाण खोऱ्यात झालेल्या संघर्षात २० जवान हुतात्मा झाल्यानंतर विरोधकांकडून मोदी सरकारला जाब विचारला जात आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही यासंदर्भात एक ट्विट केले आहे. चीनच्या घुसखोरी केव्हा चोख प्रत्युत्तर मिळणार आहे? गोळीबार न होता आपले २० जवान शहीद झाले आहेत. आपण काय केले? चीनचे किती सैनिक मारले गेले? चीनने भारताच्या हद्दीत घुसला आहे का? पंतप्रधानजी, संघर्षाच्या या काळात देश तुमच्या सोबत आहे. पण, सत्य काय आहे? बोला. काहीतरी बोला. देशाला सत्य ऐकायचे आहे. पंतप्रधानजी तुम्ही शूर व यौद्धे आहात…तुमच्या नेतृत्वाखाली देश चीनचा बदला घेईल… जय हिंद, असे ट्विट करत संजय राऊत यांनी पंतप्रधानांना सत्य सांगण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, भारत आणि चीन यांच्यात १९७५ नंतर पुन्हा एकदा तीव्र संघर्षाला सुरुवात झाली आहे. सोमवारी गलवान खोऱ्यात चिनी सैन्य आणि भारतीय सैन्यांच्या झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाल्याने देशात चीनविरोधात संतप्त भावना निर्माण झाली आहे.

Protected Content