पदवीधर मतदार नोंदणीसाठी पाचोऱ्यात राजकीय बैठक

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | नाशिक पदवीधर मतदार संघाच्या मतदानासाठी नवीन मतदारांची नाव नोंदणी सुरू असून याबाबत पाचोरा तहसिल कार्यालयात तहसिलदार कैलास चावडे यांच्या अध्यक्षतेखाली व निवडणूक नायब तहसीलदार रणजित पाटील यांच्या उपस्थितीत येथील राजकीय पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.

या बैठकीस काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, उद्धव ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष शरद पाटील, शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष सुनिल पाटील, आर. पी. आय. चे तालुकाध्यक्ष विनोद अहिरे उपस्थित होते. दि. १ आॅक्टोबर ते दि. ७ नोव्हेंबर पर्यंत नवीन नाव नोंदणीची मुदत असून यासाठी पदवीचे प्रमाणपत्र, मार्कसीट, रहिवासी पुरावा द्यावयाचा आहे. यावेळी मतदान कार्डास आधार कार्ड लिंक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तहसीलदार कैलास चावडे यांनी पदवीधर मतदार यादीत जास्तीत जास्त मतदारांना नाव नोंदणीसाठी प्रवृत्त करण्याचे आवाहन केले. व यासाठी पदाधिकाऱ्यांनी जनजागृती करण्याचेही यावेळी सांगितले.

Protected Content