केसीई आयएमआर येथे “स्वावलंबी भारत” कार्यशाळा

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केसीईआयएमआर मध्ये “स्वावलंबी भारत” कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.

या कार्यशाळेत श्रीकांत झांबरे डिस्ट्रिक्ट ऑफिसर नाबार्ड, दिनेश गव्हाळे, डिस्टीक इंडस्ट्रिअल सेंटर समीर साने, लघु उद्योग भारती युवराज परदेशी, स्टार्ट अप इंडिया या पुस्तकाचे लेखक आणि स्टार्ट अप तज्ञ , आय एम आर च्या डायरेक्टर प्रा डॉ शिल्पा बेंडाळे, ट्रेनिंग अ‍ॅन्ड प्लेसमेंट हेड पुनीत शर्मा आणि अजिंक्य तोतला उपस्थित होते.

या प्रसंगी प्रस्तावना करतांना प्रा डॉ शिल्पा बेंडाळे म्हणाल्यात, ” व्यवसाय सुरु करा सांगणे सोपे असते पण त्यासाठी काय फाॅर्मॉलीटी कराव्या लागतात.. डाॅक्युमेंटेशन काय हवे हे मार्गदर्शन फार महत्वाचे असते. तेच या कार्यशाळेत तुम्हाला सांगितले जाईल. स्वतः स्वतःची एम्प्लॉयमेंट जनरेट करा. उदाहरण म्हणुन नायका ब्रॅन्ड कडे बघा. अश्या आयडिया महत्त्वाच्या ठरतात. की नोट स्पिकर ,श्रीकांत झांबरे म्हणाले “तुमच्या वयात स्वप्न असतात पण तुम्हाला गरज असते ती मार्गदर्शनाची. फर्स्ट जनरेशन बिझीनेसमन व्हा. भारताची आर्थिक सामाजिक सिच्युएशन समजावुन घ्या. बिझनेस अॅडमिनीस्टेशन करतांना हे घटक लक्षात घेतले पाहिजे. जळगावचे आहात म्हणून कधीही स्वताला कमी समजू नका. प्रत्येकाची क्षमता वेगवेगळ्या आहेत. त्यानुसार मला काॅम्पिटीशन कुठे आणि कशी आहे हे समजून घ्या.

जे कराल त्यात सातत्य ठेवा. तुमच्याकडे तारण ठेवायला काही नसेल तर अनेक बँक क्रेडिट गॅरंटी स्कीम उपलब्ध आहेत. एस ई ए डी सी, पी एम एफ एम ई, सी जीपी एम एस सी. त्याचबरोबर डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार कसा करायचा हे सुद्धा समजावुन घ्या. 50 % जीडीपी सर्व्हिस सेक्टर वर अवलंबुन आहे. 20 %जीडीपी शेती आणि शेतीपूरक उद्योगांवर अवलंबुन आहे ( 15 कोटी लोक) त्यामुळे अॅग्रीक्लिनीक ही संकल्पना लक्षात घ्या आणि त्याचा लाभ घ्या. त्यानंतरचे वक्ते डी आय सी चे दिनेश गव्हाळे यांनी पी एम ई जी पी, सी एम ई जी पी तसेच बिज भांडवल योजनांची माहिती दिली ते म्हणालेत, एस एम एस स्कीम साठी 20 % मार्जिन मनी डी आय सी देते. तसेच सर्विस इंडस्ट्री साठी ही काही स्कीम आहेत. सामूहिक प्रोत्साहन योजना आहे.

त्यात इलेक्ट्रिक बिलात सुट असते. जी एस टी लागत नाही. उद्योग जगवण्याची सोय सरकार करते तुम्ही त्याचा फायदा घ्या. त्यानंतर स्टार्ट अप हे मिशन म्हणुन काम करणारे वक्ते युवराज परदेशी यांनी विद्यार्थ्यांना स्टार्ट अप संबधीत अनेक गोष्टी विस्तृत पणे सांगितल्यात.

युनिकॉर्न बिझीनेस ची मोठी संकल्पना उलगडून दाखवली. 8000 कोटी च्या आसपास पोहचले की युनीकाॅन मध्ये सामील होतो. 2021 मध्ये 40 % युनीकाॅन पर्यत पोहोचले कारण लोकांनी मंदीत संधी शोधली. पँडेमिक परेड होता. के सि ए एल 20 लाख फंडिंग. देतात. त्यांनी पिचींग ही संकल्पना इन्क्युबेशन सेंटर ची मदत केव्हा आणि कुठे होते ते सांगितले. जुगाडु कमलेश चे उदाहरण देत विद्यार्थीनींशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या अनेक शंकांची उत्तरे दिलीत. आभारप्रदर्शन डॉ शमा सराफ यांनी केले.

Protected Content