चिथावणाऱ्यांना व्यक्तींवर गुन्हे दाखल व्हावेत – राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे (व्हिडीओ)

भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एसटी आंदोलक कर्मचाऱ्यांना चिथावून शरद पवार यांच्या या निवासस्थानी दगडफेक आणि चप्पलफेक करण्याचं कटकारस्थान रचले असण्याची शक्यता व्यक्त करत चिथावण्याचं काम करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल जळगावचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी केली.

याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना ते म्हणाले, “नरेंद्र मोदी यांच्याशी शरद पवार यांनी भेट घेऊन चर्चा केल्याने काही राजकीय व्यक्तींना पोटशूळ होऊन एसटी आंदोलक कर्मचाऱ्यांना चिथावून शरद पवार यांच्या या निवासस्थानी दगडफेक आणि चप्पलफेक करण्याचं कटकारस्थान रचले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांना चिथावण्याचं काम करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी त्यानी यावेळी केली.

येणाऱ्या काळातील राजकारणाची हि धोक्याची घंटा –

पुढे बोलतांना ते म्हणाले की, हि महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारी घटना असून झालेला प्रकार अतिशय निंदनीय आहे. महाराष्ट्रात विविध स्तरावर होतोय या घटनेचा जाहीर निषेध होत असून अनेकांना महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे कार्य पहावली जात नाही. दररोज काही ना काही घटना या महाराष्ट्रात या सरकारच्या विरोधात करण्याचा प्रयत्न करण्यात येत असतो. त्या सर्व लोकांचा आम्ही जाहीर निषेध करतो. असा प्रकार महाराष्ट्रात अगोदर घडलेला असून नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या घटनेवर ‘ईट का जवाब पत्थर से’ देईल. महाराष्ट्राची जनता अशा लोकांना माफ करणार नाही. येणाऱ्या काळात राजकारणातील हि धोक्याची घंटा आहे असून अशा घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो.” असे त्यानी सांगितले.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/356957536372722

Protected Content