तरुणाला मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल

mundan

 

मुंबई प्रतिनिधी । राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या वडाळा येथील तरुणाला शिवसैनिकांनी मारहाण करत त्याचे मुंडन केले होते. याप्रकरणी अखेर मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांविरोधात वडाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, समाधान जुगदार, प्रकाश हंसबे, सत्यवान, श्रीकांत यादव अशी या चौघांची नावे आहेत. या चौघांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात पोस्ट टाकणाऱ्या हिरामणी तिवारी या व्यक्तीला चोप दिला होता. इतक्यावर न थांबता यांनी तिवारी यांचे मुंडणही केले होते. या चौघांविरोधात आयपीसी कलम १४३, १४७, १४९, ३२३, ३२५, ३४२, ५०४, ५०६, ५९६ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चौघांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमेय्या यांनी दाखल केलेल्या गुन्ह्याची एफआयआर कॉपी ट्विटद्वारे शेअर केली आहे. ही घटना घडल्यानंतर किरीट सोमय्या यांनी त्या विरोधात आवाज उठवला होता. त्यानंतर ते सतत या घटनेबाबत बोलतही होते.

Protected Content