सिल्व्हर ओकवरील हल्ला : गुणरत्न सदावर्ते पोलिसांच्या ताब्यात

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब घरावर एसटी कामगारांनी हल्ला केल्या प्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

आज दुपारी ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवास स्थानावर एसटी कर्मचार्‍यांनी हल्लाबोल करत बंगल्यावर चप्पल आणि दगडफेक केली. पोलिसांनी, या हल्ल्याप्रकरणी १०७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात २३ महिलांचाही सहभाग असल्याच समोर आलं आहे. दंगल परिस्थिती निर्माण करणे आणि षडयंत्र रचणे अशी विविध कलम लावून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यानंतर पोलिसांनी एसटी कर्मचार्‍यांची वकील गुणरत्न सदावर्ते यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कोणतीही पूर्व नोटीस न देता आपल्याला चौकशीसाठी नेत असल्याचे सदावर्ते यांनी म्हटले आहे. तसेच, चौकशीमध्ये पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर घरा बाहेर पडताना आपली हत्या होऊ शकते असा खळबळजनक आरोप सदावर्ते यांनी केला.

Protected Content