नशिराबाद ते घाणखेड रस्त्यांच्या कामांची पाहणीसह चौकशी करण्याची मागणी

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद ते घाणखेड या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. केलेल्या कामांची चौकशी करून संबधीतांवर कारवाई करण्याची मागणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटिल यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देवून केली आहे.

दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, नशिराबाद ते घाणखेड या रसत्याची अवस्था बिकट झाली आहे. त्यामूळे गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांकडून वारंवार मागणी होऊनही सार्वजनिक बांधकाम बोदवड उपविभागाकडून दुर्लक्ष होत आहे. घाणखेडपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने शासनाच्या लाखो रुपयांचा चुराडा होत आहे. या सर्व प्रकारावर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटिल यांनी अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांची भेट घेत निवेदन दिले. यादरम्यान राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. रसत्यावरील कामे ऊत्कृष्ठ दर्जाचे व्हावेत अन्यथा याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबतच्या सुचना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांना दिल्या.

दरम्यान, येत्या ७ दिवसांत कारवाई न झाल्यास अधिक्षक अभियंत्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटिल, जिल्हा उपाध्यक्ष अंबादास गोसावी,  किरण पाटिल, पराग घोरपडे,  इम्रान खान ईद्रीस खान , दिग्विजय पाटिल , शिवाजी पवार , अमोल व्यवहारे यांच्यासह आदी उपस्थित होते.

 

 

Protected Content