जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील महावीर ज्वेलर्सच्या समोरील दुकानाजवळून एका मजुराची ४० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रविवार २३ एप्रिल रोजी रात्री १० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शांताराम शालिग्राम वाघ (वय-४६) रा. सुरेशदादा जैन नगर, कुसुंबा, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून ते जळगाव शहरातील महावीर जेलरच्या जवळील एका ठिकाणी नोकरीला आहे. १४ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता शांताराम वाघ हे त्यांची दुचाकी (एमएच १९ सीएम ९४०८) या क्रमांकाच्या दुचाकीने गावात आले. शहरातील महावीर ज्वेलरच्या दुकानासमोर असलेल्या एका दुकानाच्या बाजूला त्यांनी त्यांची दुचाकी पार्किंग करून लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ४० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले. शांताराम वाघ यांनी त्यांच्या दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, परंतु दुचाकी कुठेही मिळून न आल्याने अखेर रविवार २३ मार्च एप्रिल रोजी रात्री ११ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक प्रफुल्ल धांडे करीत आहे.




