अनुराग स्टेट बँक कॉलनीत घरफोडी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील अनुराग स्टेट बँक कॉलनीत बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण १ लाख ३२ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. या संदर्भात रविवारी २३ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामानंदनगर पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, बद्रीनाथ जवाहरलाल चौधरी (वय-४९) रा.अनुराग स्टेट बँक कॉलनी, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने बद्रीनाथ चौधरी हे २२ एप्रिल रोजी घर बंद करून बाहेरगावी गेले होते. त्यावेळी घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचा मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत गोदरेज कपाटातून सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण १ लाख ३२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. बद्रीनाथ चौधरी हे रविवारी २३ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता घरी आल्याने त्यांच्या घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. या संदर्भात त्यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायंकाळी ७ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील करीत आहे.

Protected Content