जुन्या वादातून कंडारीत दोन गटात राडा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कंडारी येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी होवून एकामेकांना दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रविवारी २४ एप्रिल रोजी एकाच कुटुंबांवर नशिराबाद पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

एमआयडीसी पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कंडारी गावातील सेवालाल महाराज यांच्या मंदीराच्या ओट्यावर बादल लक्ष्मण परदेशी आणि त्याचा शेजारी राहणारा शेखर जैसवाल जाधव हे दोघेजण रविवारी २३ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता गप्पा मारत बसले होते. त्यावेळी गावात राहणारे प्रशांत पाटील, मयुर सुर्वे, सुनिल सुर्वे, हर्षल बाविस्कर आणि अक्षय राजेंद्र पाटील यांनी येवून जुन्या भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून बादल परदेशी आणि शेखर जाधव यांना अश्लिल शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली. जातीवाचक शिवीगाळ करून खून करण्याची धमकी दिली. भांडण सुरू असतांना बादलचा भाऊ आकाश परदेशी, आई कुसुमबाई परदेशी, जिजाबाई राजू मोरे, गंगूबाई पुनमसिंग मोरे यांना देखील पाचही जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी बादल बादल लक्ष्मण परदेशी आणि त्याचा शेजारी राहणारा शेखर जैसवाल जाधव यांनी दिलेल्या वेगवेगळ्या दोन फिर्यादीवरून संशयित आरोपी प्रशांत पाटील, मयुर सुर्वे, सुनिल सुर्वे, हर्षल बाविस्कर आणि अक्षय राजेंद्र पाटील सर्व रा. कंडारी ता.जि.जळगाव या पाच जणांविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे आणि पोहेकॉ. गजानन देशमुख हे करीत आहे.

Protected Content