धक्कादायक : अनैतिक संबंधातून पुतणीस डांबून ठेवल्याचे उघड

crime 2

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील एका नराधमाने स्वतःच्या पुतणी सोबत अनैतिक संबंधातुन तिला व तिच्या सात वर्षाच्या मुलीला आपल्या बहिणीच्या घरात लपवुन ठेवले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहे. या दुदैवी प्रकारास बळी पडलेली महीला व तिच्या मुलीस पोलीसांनी शोधुन आपल्या ताब्यात घेतले आहे .

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की , यावल तालुक्यातील एका गावात आपल्या आईसोबत राहणारी एक २८ वर्षीय तरूणीचे सात वर्षापुर्वी भुसावळ तालुक्यात तिचे लग्न झाले होते. पण काही वर्षानंतर तिच्या पतीचे आजाराने निधन झाल्यापासुन ती तेव्हापासुन आपल्या आई सोबत आपल्या मुलीसोबत राहात होती. ही तरुणी मागील दोन आठवडयापासुन आपल्या सात वर्षाच्या मुलीसह हरवल्याची नोंद यावल पोलीस स्टेशनला दाखल आहे. या संदर्भात यावल तालुक्यातील एका गावात एक तरूण विधवा आपल्या लहान मुलीसह एका महीलेकडे राहात असल्याची माहीती गावातील पोलीस पाटील राजरत्न आढाळे यांनी यावलचे पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांना दिली. पोलीस निरीक्षक यांनी गांभींयांने तपासाची चक्रे फिरवुन अखेर बेपत्ता झालेल्या त्या विधवा तरूण महीला व तिच्या सात वर्षाच्या मुलीस शोधण्यास यश आले. दरम्यान, पोलीस निरीक्षकांनी विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्या विधवा तरूणीने सांगीतलेल्या प्रकाराने पोलीस देखील आवाक झालेत. त्या विधवा तरूणीने तिच्या वरील झालेले प्रसंगातुन सांगीतले की, नात्यांने काका लागणारे संतोष यशवंत इंधाटे यांनी माझ्याशी अनैतिक संबंध ठेवले व तिला लपवुन ठेवले. मात्र , पोलीसांची दक्षता आणि पोलीस पाटील आढाळे यांनी दाखवलेली जागृतेने हे प्रकार उघडकीस आला आले. या गुन्ह्यातील संशीयत संतोष इंधाटे या नराधमा विरूद्ध पोलीस कारवाई केली जाणार आहे.

Protected Content