ट्रक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

 

जळगाव प्रतिनिधी । वाळूने भरलेल्या ट्रकरने सामोरून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची आव्हाणे शिवारातील लक्ष्मी जिनिंगसमोर घडली जखमींना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, समाधान जगन गुजर (वय-२६) रा. आसोदा ता.जि.जळगाव हा आव्हाने शिवारात असलेल्या अंकिता जिनींग कंपनीत काम करतो. आज सकाळी १० वाजेच्या सुमारास जिनींग कंपनीत कामाला जाण्यासाठी दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीसी ८७०७) ने जात होता. समोरून वाळून भरलेला ट्रक्टर (एमएच १९ बीजी ९४६४)ने जोरधार धडक दिल्याने दुचाकीस्वार समाधान गुजर याच्या एक पाय आणि हाताला गंभीर दुखपत झाली आहे. तर ट्रक्टर चालक सुकलाल शालिक मोरे (वय-४०) रा. खेडी ता.जि.जळगाव हा देखील जखमी झाला आहे. दोघांना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

Protected Content