सागवान लाकडाची पुन्हा तस्करी करणाऱ्यास अटक; पोलीसात गुन्हा

यावल प्रतिनिधी । सागवान लाकडांची तस्करी करणाऱ्या एकाला अटक करण्यात यावल पोलीसांना यश आलेत. या कारवाईत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दोन दिवसांपुर्वी साडेपाच लाखांचे सागवान लाकडाच्या पाट्यांची अवैधरित्या तस्करी करतांना वाहनचालकास अटक केली होती. त्याच गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी हा १७ जून रोजी मध्यरात्री पुन्हा सागवान लाकडाची तस्करी करत असल्याची गोपनिय माहिती यावल पोलीसांना मिळाली. त्यानुसार संशयित आरोपी गणेश बळीराम बोरसे (वय-४७) रा. डांभूर्णी ता.यावल हा सागवान लाकूड तस्करीच्या प्रयत्नात असतांना पोलीसांनी छापा टाकला. यात संशयित गणेश बोरसेने पोलीस पथकावर लोखंडी पहार आणि चाकूने हल्ला केला व शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. यात एका कर्मचाऱ्याला किरकोळ जखम झाली आहे. पोकॉ जगन्नाथ पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित गणेश बोरसे विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि सुनिता कोळपकर करीत आहे.

दोन दिवसांपुर्वी तालुक्यातील डांभुर्णी गावाजवळ साडेपाच लाख रुपयाचे किमतीचे सागवानी 20 कट साइज पाट्या अवैध मार्गाने चारचाकी वाहनाने तस्करी करणार्‍या वाहन चालकास अटक केली होती. त्याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.

Protected Content