भरधाव कारच्या धडकेत महिला गंभीर जखमी; बामणोद जवळील घटना

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील बामणोद गावाजवळ कारच्या जोरदार धडकेत महिला गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. जखमी महिलेस जळगाव येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, तालुक्यातील बामणोद येथील भुसावळ-फैजपुर राज्य मार्गावर १० जुन रोजी दुपारी २.२० वाजेच्या सुमारास बामणोद येथील राहणाऱ्या शोभा मोहन नेहेते (वय-४५) या शौचास गेल्या असता घरी परत येत असतांना रावेरहुन भुसावळकडे जाणाऱ्या गणेश प्रभाकर महाजन यांच्या ताब्यातील (एमएच १७ एएल ६६७७) या स्वीफ्ट कारने भरधाव वेगाने चालवुन शोभा नेहते यांना जोरदार धडक दिली. अपघातात त्या गंभीर जखमी झाल्यात अपघात झाल्याचे कळताच नागरीकांनी धाव घेतली. अपघातात गंभीर दुखापत होवुन जखमी झालेल्या महीलेस त्यांच्या कुटुंबाच्या मंडळीने तात्काळ मोटरसायकलवर उपचारासाठी घेवुन गेले असल्याचे वृत आहे.

Protected Content