बेपत्ता बालकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

bepatta mulgaजामनेर प्रतिनिधी। तालुक्यातून फत्तेपूर येथून बेपत्ता झालेल्या दीपक ईश्‍वर सुपडकर या विद्यार्थ्याचा तलावातील पाण्यात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, फत्तेपूर येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये इयत्ता ५ वित शिकत असलेला दिपक ईश्‍वर सुपडकर (गोंधळी) वय ११वर्ष हा १६जुलै ला बेपत्ता झाला होता. या संदर्भात १७जुलै ला पहुर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर मादणी येथील लघु पाटबंधारे तलावाच्या डबक्यात त्याचा मृतदेह गुराख्याला दिसला.त्यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे चाळीसगावं परिमंडळ उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्‍वर कातकडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा जळगाव पोलिस निरीक्षक बापू रोहम, पहुरचे एपीआय डी. के.शिरसाठ घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी त्याचा आई वडिलांना सोबत घेऊन मृतांची ओळख पटवली. दरम्यान, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Protected Content