न्हावीच्या उपसरपंचपदी सतीश जंगले यांची निवड

satish jangle nivad

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । तालुक्यातील न्हावी येथील उपसरपंचपदी सतीश वामन जंगले यांची निवड करण्यात आली आहे.

न्हावी येथील उपसरपंच सुनील भोगे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागी सतीश जंगले यांची निवड करण्यात आली. यासाठी लोकनियुक्त सरपंच भारती चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सभागृहात पार पडली. यात उपसरपंच पदासाठी सतीश वामन जंगले व यशवंत माधव तळेले या दोन उमेदवारांनी नामांकन दाखल केले. दोघांचे अर्ज वैध इतर असल्याने व माघार न झाल्याने निवडणूक घेण्यात आली. यात सतीश जंगले यांना १२ तर यशवंत तळेले यांना ६ मते मिळाली. यामुळे त्यांची उपसरपंचपदी निवड जाहीर करण्यात आली.

याप्रसंगी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी यांनी काम पाहिले. सतीश जंगले यांची उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद महाजन, दूध उत्पादक सहकारी संस्था चेअरमन नितीन चौधरी, अक्षय पतसंस्थेचे चेअरमन सुनील फिरके, पंचायत समिती सदस्य सरफराज तडवी, विकास चेअरमन प्रितेश पाटील, भारत विद्यालयाचे माजी चेअरमन अविनाश फिरके, नगरसेवक मिलिंद वाघुळदे व खरेदी-विक्री संघाचे उपसभापती नितीन नेमाडे यांच्यासह मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले आहे.

Protected Content