देशात गेल्या 24 तासांमध्ये 11090 रुग्ण वाढले !


नवी दिल्ली (वृत्तसंस्था)
आज सलग चौथ्या दिवशी नवीन रुग्णांचा आकडा हा 10 हजारांच्या घरात गेला आहे. गेल्या 24 तासांमध्ये 11 हजार 090 रुग्णांची वाढ झाली आहे. देशात मंगळवारी मृतांचा आकडाही 11 हजार 921 वर पोहोचला आहे. तर मंगळवारी 2004 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

 

देशात आता एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 86 हजार 935 झाला आहे. तर एकूण मृतांचा आकडा 11 हजार 903 झाला आहे. यासह भारताचा मृत्यूदर 2.9% वरून 3.4 झाला आहे. देशात कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus In India) पहिला मृत्यू झाल्यानंतर 100 दिवसांच्या आतच 10 हजारहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात पहिल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू 12 मार्चला झाला होता. इतर देशांच्या तुलनेत कोरोनाबाधितांच्या एकूण आकडेवारीनुसार चौथ्या क्रमांकावर आहे. भारताच्या आधी अमेरिका, ब्राझील, रशिया यांच्या क्रमांक लागतो. तर कोरोना रुग्णांच्या संख्येत देशभरात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर गुजरातचा क्रमांक होता. मात्र आता गुजरातला मागे टाकत दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Protected Content