Home आरोग्य तरूणांच्या लसीकरणाचीही व्यवस्था करा : आव्हाड

तरूणांच्या लसीकरणाचीही व्यवस्था करा : आव्हाड

0
91


मुंबई प्रतिनिधी । राज्यातील कोरोना संसर्गाचा वाढता वेग पाहता ३५ वर्षांच्या खाली असणार्‍यांचेही लसीकरण करण्यात यावे अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

आजपासून राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत नवीन निर्बंध लादण्यात आले आहेत. अर्थात, संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याने सरकारची चिंता वाढली आहे. या पार्श्‍वभूमिवर, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे आता नवीन मागणी एका ट्विटच्या माध्यमातून केली आहे.

जगभरात भारत हा तरुणांचा देश आहे अशी आपली ओळख आहे. या कोरोना संक्रमण काळात कोरोनाची लागण तरुणांना जास्त होताना दिसतं आहेत. त्यामुळे 18 ते 35 वयोगटातील तरुणांना ताबडतोब लसीकरणाची व्यवस्था करावी, अशी विनंती जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. त्याशिवाय पत्रकारांना लसीकरणाची व्यवस्था व्हावी. या मागणीला मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक पाठिंबा दिला असून लवकरच त्याची घोषणा करतो असे त्यांनी आता भ्रमणध्वनीवर मला सांगितले आहे. मुख्यमंत्री हे करतील यावर माझा विश्वास आहे., असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

आज आपल्या एका पत्रकार मित्राचे कोरोनामुळे निधन झाले.मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो कि, राज्यातील जेवढे पत्रकार आहेत जे संकटाला सामोरे जाऊन आपल्याला माहिती देत असतात, समाजाला जागृत ठेवत असतात. त्यांना लस देणे जरुरीचे आहे. त्यांची ही मागणी आपण ताबडतोब मान्य करावी, असेही त्यांनी ट्वीट करत सांगितले.


Protected Content

Play sound