रावेर पाठोपाठ यावल तालुक्यात केळी नुकसानीची लागण : संशयितांवर कारवाईची मनसेची मागणी

यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | रावेर पाठोपाठ यावल तालुक्यात पण शेतकऱ्यांचे नुकसान अज्ञात व्यक्तिकडून करण्यात येत असून अशा घटनांना आळा बसवून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेसन जनहितकक्ष जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांनी यावल पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

निवेदनाचा आशय असा की, रावेर चिनावल शिवारात शेतातील उभे पीक कापून फेकण्याची घटना घडत आहेत. हे लोण यावल तालुक्यात देखील आले आहे. यावल येथील प्रगतशील शेतकरी किशोर राणे अट्रावल रस्त्यावरील शेतात टिश्युकल्चर जातीचे २५०० केळीचे घड कापून फेकण्याचा प्रकार समोर आला आहे. यात त्याचे ६ लाखाचे रूपयांचे नुकसान झाले. शेतकरी आधीच अडचणीत असतांना त्याच्या पिकांचे होणारे नुकसान त्यांना आर्थिक संकटात लोटणारे ठरत आहे. शेतकऱ्यांचे होणाऱ्या नुकसानीस जबादार कोण ? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. ज्यो कोणी अज्ञात व्यक्ति या घटनेमागे असतील त्यांचा लवकरात लवकर शोध लावून त्यांना कडक शासन करा. आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून जे शक्य आहे तेवढी मदत शेतकऱ्यांच्या हितासाठी करू व त्याच्या पाठीशी खंबीर उभे राहू अशी ग्वाही दिली आहे. निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेसन जनहितकक्ष जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर, किशोर नन्नवरे गौरव कोळी, शाम पवार, अनिल सपकाळे, आबिद कच्छी आदींची स्वाक्षरी आहे.

 

Protected Content