हिंगोणा मोर प्रकल्प धरणांवर पर्यटकांची गर्दी

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या मोर धरण क्षेत्रात मागील काही दिवसांपासून पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील नागरीकांची मोठी गर्दी होत आहे. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनाई असतांना धरणावर गर्दी करणाऱ्यांवर कायदेशी कारवाई करण्याचे आदेश प्रांताधिकाऱ्यानी दिले आहेत.

हिंगोणा मोर प्रकल्प धरणावर पर्यटक गर्दी करीत असल्याने सध्या कोरोना विषाणुच्या साथीच्या रोगामुळे लागु करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन होत आहे. यापुढे धरणावर गर्दी करणाऱ्यांवर कायद्याशीर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला प्रांत अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी दिले आहे या संदर्भात प्रांत अधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांनी महसुल प्रशासनास दिनांक ३ सप्टेंबर रोजी पाठवलेल्या आदेशपत्रात म्हटले आहे की , सार्वजनीक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यात उद्धभवलेल्या कोरोना विषाणुसंसर्गाच्या पार्श्वभूमीवर साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७हा३१ मार्च २०२०पासुन संपुर्ण राज्यात लागु करण्यात आला आहे. यावल तालुक्यातील हिंगोणा गावाजवळ सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेले मोर प्रकल्प धरण या ठिकाणी मागील काही दिवसापासुन या धरणावर रविवार या सुटीच्या दिवशी परिसरातुन आणि जळगाव जिल्ह्यातुन मोठया प्रमाणावर धरणावर पर्यटकांची गर्दी होत आहे.

या गर्दीमुळे कोरोना विषाणुसंसर्ग प्रतिबंधक कायद्याचा उल्लंघन होत असल्याने या गोंधळामुळे संसर्ग वाढीला लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले असुन , खबरदारीचा उपाय म्हणुन प्रांत अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी मोर प्रकल्प धरणास प्रतिबंधक क्षेत्र म्हणुन घोषीत केले आहे. या संदर्भात धरणाकडे जाणारे सर्व मार्ग तात्काळ बंद करावीत व या मार्गाने कायद्यामोडुन मोटर वाहनानी जाणाऱ्यांवर मोटर वाहन अधिनियम कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी असे आदेश प्रशासनास दिले आहे.

Protected Content