शिक्षकांचे उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी उपयोगी

 

जळगाव, प्रतिनिधी । आपला जिल्हा आपले उपक्रम भाग दोन या डिजिटल बुक चे जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या ऑनलाईन सभेत प्रकाशन करण्यात आले. त्याप्रसंगी या ई -पुस्तकातील शिक्षकांचे उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी उपयोगी ठरतील असे शिक्षण सभापती रवींद्र पाटील यांनी प्रतिपादन केले.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग अंतर्गत प्राथमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे व उपशिक्षणाधिकारी डॉ. डी. एम. देवांग, उपशिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आपला जिल्हा आपले उपक्रम’ हे ई-पुस्तक तयार करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम लॉकडाऊनच्या काळात राबविण्यात आला होता. या पुस्तक प्रकाशनप्रसंगी शिक्षण व क्रीडा समिती सभापती रवींद्र पाटील, पोपट भोळे, गजेंद्र सोनवणे, शिक्षणाधिकारी प्राथमिक भाऊसाहेब अकलाडे , शिक्षणाधिकारी माध्यमिक भास्कर पाटील , शिक्षणाधिकारी निरंतर किशोर पाटील , शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार, राजेंद्र सपकाळे, सरला पाटील, स्वीय सहाय्यक कांतीलाल पाटील, संदीप पवार, राहुल चौधरी, सुनील दाभाडे, कक्ष अधिकारी डी. एन. वाणी, लेखाधिकारी शामकांत न्याहाळदे आदी उपस्थित होते.

ई -पुस्तक तयार करण्याची संकल्पना पाचोरा तालुक्याच्या राजुरी शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा मुकुंदराव उदावंत व शहापुरा शाळेचे उपशिक्षक पंकज पालीवाल यांनी मांडली होती. प्राथमिक शिक्षण विभागामार्फत आयटी सेलची निर्मिती करण्यात आली असून या अंतर्गत ई – बुक संपादनाची जबाबदारी शिक्षण विस्तार अधिकारी विजय शांतीलाल पवार यांनी सांभाळली. त्यांना जामनेर तालुक्यातील पाळधी येथील जिशाळेतील उपशिक्षक संभाजी हावडे यांनी सहकार्य केले.

पालकमंत्री पाटील यांच्यासह मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा
उपक्रमासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचन्द पाटील तसेच शिक्षण सभापती रवींद्र पाटील, समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील , डायट प्राचार्या मंजुषा क्षीरसागर , माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.जे. पाटील ,निरंतर शिक्षणाधिकारी के. ए. पाटील यांचे शुभेच्छा संदेश प्राप्त झाले आहेत.

या पुस्तकाचा पहिला भाग यापूर्वी प्रकाशित झाला असून शिक्षकांनी याचे उत्स्फूर्त स्वागत केले होते. भाग दोन या पुस्तकातही शिक्षकांचे अभिनव उपक्रम समाविष्ट केलेले असून त्यापासून इतरांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने जिल्ह्यातील शिक्षकांकडून लॉकडाउनच्या कालावधीचा उत्कृष्टरित्या उपयोग करून घेतला व लेखन कौशल्य प्रोत्साहन दिले. खूप मोठा प्रतिसाद या उपक्रमाला मिळालेला आहे.

डिजिटल बुक भाग दोन पुस्तकाच्या निर्मितीसाठी यांचे लाभले सहकार्य
डिजिटल बुक भाग दोन पुस्तकाच्या निर्मितीसाठी राजेंद्र कोळी, सोनाली साळुंखे, रत्नाकर पाटील, विजया पाटील , कल्पना पाटील , संदीप पवार , राहुल चौधरी , सुनील दाभाडे, मनोहर तेजवानी, अरुण पाटील, विलास निकम, ईश्वर महाजन इत्यादी शिक्षकांनी सहकार्य केले. तसेच जिल्ह्यातील सर्व उपशिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख या सर्वांचे अनमोल सहकार्य लाभले असून पुस्तक निर्मिती कार्यात मधुकर घायदार संपादक शिक्षक ध्येय यांचे विशेष सहकार्य मिळाले.

Protected Content