गरूड महाविद्यालायाच्या रासेयो एककास तंबाखूमुक्त अभियानाबद्दल पुरस्कार

शेंदूर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । येथिल अप्पासाहेब र.भा.गरूड कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालायाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककास संबंध हेल्थ फाऊंडेशन दिल्ली यांच्या वतीने २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षातील तंबाखूमुक्त अभियानाबद्दल उत्कृष्ट एककाचा पुरस्कार देण्यात आला आहे.

या संस्थेने देशभरात प्लेज फॉर लाईफ या नावाने व्यापक तंबाखूमुक्त अभियान राबविले होते.या अभियाना अंतर्गत महाविद्यालयाचे रासेयो स्वयंसेवक राहुल पाटील व अश्‍विनी घोलप यांनी वर्षभरातील तंबाखमुक्ती उपक्रमांद्वारे एकूण ५७५८ तरूणांना याचे दुष्परिणाम समजावून त्यांना तंबाखुमुक्तीची शपथ दिली. या राबविण्यात आलेल्या उपक्रमांची दखल घेऊन या स्वयंसेवकांना उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार,तसेच मार्गदर्शक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.दिनेश प्रकाश पाटील यांना उत्कृष्ट टीम लीडर चा पुरस्कार मिळाला. तसेच सागर तडवी ह्या स्वयंसेवकास उत्कृष्ट उपक्रमात सहभागाबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले.

या पुरस्कारात दोन मानचिन्ह एक गोल्ड व एक सिल्व्हर पुरस्काराचे मानचिन्ह देण्यात आले आहेत. तसेच गौरवपत्र सुद्धा देण्यात आले आहेत. या प्रसंगी एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष संजय गरूड, सचिव सागरमल जैन, सहसचिव.दिपक गरूड, संस्थेचे संचालक यु. यु.पाटील, संजय देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वासुदेव आर.पाटील यांनी पुरस्काराने सन्मानित रासेयो स्वयंसेवकांचे व कार्यक्रम अधिकारी यांचे अभिनंदन केले. या उपक्रमात रासेयो सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.वसंत एन.पतंगे, महिला रासेयो सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.सुजाता पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. रासेयो स्वयंसेवक माऊली सुरवाडे,व्यंकटेश उपाध्ये, सचिन कुंभार,सागर तडवी, प्रविण चव्हाण,महेंद्र शेरे यांनी उपक्रमांना सहकार्य केले.

Protected Content