अरे देवा… ऑक्सीजन संपल्याने महिलेचा मृत्यू; जामनेरातील १२ रूग्णांना तातडीने हलविले !

जामनेर प्रतिनिधी । येथील उपजिल्हा रूग्णालयात आज ऑक्सीजनचा साठा संपल्याने Shortage Of Oxygen हाहाकार उडाला. ऑक्सीजनवर असणार्‍या येथील १२ रूग्णांना डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये हलविले. यात हॉस्पीटलमध्ये जाण्याआधीच एका महिलेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. यातच मृत महिलेच्या संतप्त नातेवाईकांनी वैद्यकिय अधिकार्‍यांना विचारणा केल्यावर गोंधळ उडाला.

याबाबत वृत्त असे की, जिल्ह्यात अनेक ठिकाणी ऑक्सीजनचा तुटवडा Shortage Of Oxygen भासत आहे. काल मुक्ताईनगरात ऑक्सीजनचा तुटवडा दिसून आला. तर, आज जामनेरातही हेच चित्र दिसले. जामनेर उपजिल्हा रूग्णालयात ५२ बेडची व्यवस्था आहे. पैकी १८ ऑक्सीजन बेड आहेत. सर्व बेड फुल्ल असून दररोज तब्बल ३५ सिलेंडरची आवश्यकता असतांना दररोज केवळ २० ते २५ सिलेंडरचाच पुरवठा होत होता. त्यामुळे दिवसा १२ व रात्री १० अशाप्रकारे ऑक्सीजन पुरवून रूग्णाचा जीव वाचविण्याचा प्रयत्न रूग्णालय प्रशासनाचा सुरू होता.

दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून ऑक्सीजन सिलेंडरचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे शुक्रवारी प्रत्येेक तासाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवीली. मात्र त्यानंतरही पुरवठा झाला नसल्याने Shortage Of Oxygen अखेर शुक्रवारी जामनेर उपजिल्हा रूग्णालयातील २० पैकी १२ रूग्णांना डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पीटलमध्ये हलविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शासकीय व खाजगी मिळून आठ रूग्णवाहिकांची व्यवस्था केली. एका रूग्णवाहिकेत दोन अशाप्रकारे रूग्णांना ऑक्सीजन लाऊन रवाना केले.

दरम्यान ढालसिंगी येथील महिलेचे ऑक्सीजन सॅच्युरेशन दाखल केल्यापासूनच अत्यल्प होते. परिस्थीती नाजूक असल्याने एकाच महिलेला १०८ रूग्णवाहिकेत टाकून ऑक्सीजन लावून जळगाव खुर्द येथील डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पीटलला नेत असतांना तिचा गारखेड्याजवळ मृत्यू झाला. मृत्यु झाल्याचे कळताच रूग्णवाहिका जामनेर उपजिल्हा रूग्णालयात आणला. यावेळी संतप्त नातेवाईक अधिक्षक विनय सोनवणे व अन्य वैद्यकीय अधिकार्‍यांवर धावून गेले. जामनेर उपजिल्हा रूग्णालयाप्रमाणेच पहूर ग्रामिण रूग्णालयातही आजच्या दिवस पुरेल एवढाच ऑक्सीजन शिल्लक आहे. वेळीच ऑक्सीजन उपलब्ध न झाल्यास पहूरची परिस्थीतीही गंभीर होऊ शकते.

दर तासाला दिली माहिती

ऑक्सीजन संपल्याने १२ रूग्णांना हलविण्यात आले असले तरी सहा रूग्ण ऑक्सीजन काँन्सनट्रेटरवर ठेवण्यात आले आहेत. पैकी एका रूग्णाचे नातेवाईक स्वत: ऑक्सीजन सिलेंडर घेऊन आले. त्यामुळे आता सहा रूग्ण भरती असून अद्याप त्यांची प्रकृती चांगली आहे. त्यांना आज हलविण्यात आले नसले तरी ऑक्सीजन उपलब्ध न झाल्यास हलविण्याची वेळ येऊ शकते.ऑक्सीजन संपत असल्याबाबत दर तासाला जिल्हाधिकारी कार्यालयाला माहिती दिली. मात्र पुरवठा झाला नाही. त्यामुळे रूग्णांना हलविण्याची वेळी आली. असे मत अधिक्षक विनय सोनवणे यांनी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले.

लस व रेमडीसिविरचाही पुरवठा नाही

जामनेर उपजिल्हा रूग्णालयात ऑक्सीजनअभावी रूग्ण हलविण्याची वेळ आली. तर गेल्या काही दिवसांपासून रेम्डीसिव्हर व लसीचाही पुरेशा प्रमाणात पुरवठा नाही. शनिवारपर्यंतच पुरतील एवढ्या लस आज उपलब्ध आहेत. उद्या व्हॅक्सीन उपलब्ध न झाल्यास लसीकरणही ठप्प होईल, अशी परिस्थीती आज तरी आहे.

आम्ही हतबल !

या संदर्भात जामनेर उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.विनय सोनवणे म्हणाले की, चार दिवसांपुर्वी कुठल्याही रूग्णालयात घेतले नाही म्हणून ढालसिंगी येथील महिलेस जामनेर उपजिल्हा रूग्णालयात दाखल करून घेतले होते. उपचार सुरू असतांना शुक्रवारी ऑक्सीजन संपल्यामळे १२ रूग्णांना गोदावरी महाविद्यालयात हलवीले. त्यात या महिलेचाही समावेश होता. आधिच परिस्थीती नाजूक असल्याने गारखेड्याजवळ महिलेचा मृत्यु झाला. ऑक्सीजन, रेम्डीसिव्हर, लसींचा पुरवठा नाही. आम्हला लढाईवर पाठवीले जात आहे. लढाईसाठी बंदूक दिली मात्र गोळ्याच नाही अशी आमची परिस्थीती असल्याने आम्ही हतबल आहोत असे ते म्हणाले.

Protected Content